uddhav Thackeray

महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई, ४ जुलै २०२३: मुंबई महाविकास राष्ट्रवादी कसलाही खिंडार पडल्याने शिवसेनेचा ठाकरे गट एकला चलो रे’ च्या भूमिकेत राहणार की कॉंग्रेस आणि सत्तेतून बाहेर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदवपवार हेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचेवप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीवखंबीरपणे उभे होते. तशीच परिस्थिती शरद पवारांवर ओढवल्यानंतर उद्भव ठाकरे शरद पवारांची साथ सोडणार की शिवसेनेत फूट पडल्यानंतर साधारण वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पडल्याने आता महाविकास आघाडीचे भवितव्य
अनिश्चित झाले आहे. गटातील नेत्यांकडून सोमवारी ‘एकला चलो रेची भाषा केल्याने उद्धव ठाकरे हे
महाविकास आघाडीसोबत राहणार की साथ सोडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उद्या ठाकरे
गटाच्या शिवसेना भवन येथे होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी तयार केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे
पडले आणि आता या आघाडीचे काय होणार असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला. त्यातच आघाडीतील
मतभेदही वारंवार समोर आले. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ घटल्याबरोबर राष्ट्रवादीकडूनही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत दावा पुढे रेटला जाऊ लागला होता. त्यातच राष्ट्रवादीचेच आमदार फुटल्याने आणि ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आघाडीलाच खिंडार पडले आहे. त्यामुळे अशा दोलायमान स्थितीत उद्धव ठाकरे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे.

“उद्धव ठाकरे आपली भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट करतीलच पण एक मात्र नक्की. महाराष्ट्र सर्वसैनिकांना असे वाटतेय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र चलो, अकेला चलो’ हा नारा द्यावा आणि पुढील राजकीय कामकाजात सहभागी व्हावे.”
विनायक राऊत, खासदार, ठाकरे गट

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप