अजित पवारांसह नऊ जणांवर अपात्रतेची कारवाई, जयंत पाटील यांनी रात्री १२ वाजता केली घोषणा
मुंबई, २ जुलै २०२३: अजित पवारांसह नऊ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. पक्षाविरुद्ध पाऊल उचल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. शरद पवार यांना न सांगता शपथ घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. या लोकांविषयी जी कारवाई करण्यात येतीये ती कायदेशीर आहे. जे आमदार येतील त्यांना योग्य संधी देण्यात येईल. कारवाई होईल म्हणून काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. याविषयी निवडणूक आयोगाला माहिती दिली गेली असल्याचं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
आमदार परत आले नाहीत तर नाईलाजाने कारवाई होईल. जितेंद्र आव्हाडांचा व्हिप सर्वांना लागू असेल. ५ जुलैला सर्वांना समजेल की किती जणं शरद पवारांच्या पाठिशी आहेत. अध्यक्षांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप