अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बई, २ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंद झाले असल्याचे अखेर स्पष्ट झाले असून अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांकडे दिलेले आहे. राष्ट्रवादीच्या ५४पैकी ४० आमदारांनी बंड केल्याने शरद पवारांना जोरदार झटका बसला. पण त्यांचे विधानसभा सदस्य पद कायम राहणार आहे. एकीकडे अशी स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंद झाले असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणे देखील शरद पवार यांना जोरदार झटका बसला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप