मुंबईतील बैठका रद्द करून एकनाथ शिंदे पोहचले साताऱ्यातील गावात
वाई, २१ जून २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईसह राज्यातील दौरे रद्द करून, बैठका रद्द करून थेट दुपारी साताऱ्यातील दरे तर्फ तांब (ता.महाबळेश्वर) यावात पोहचले. कोणतीही सरकारी यंत्रणा व लवाजम्या शिवाय मुख्यमंत्री आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
आज दुपारी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयना विभागातील दरे काम गावी पोहोचले .आढावा बैठकी प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी पोलीस व महसूल भागाचे,महाबळेश्वर पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांचा आज जाहीर दौरा नव्हता. अचानक दौऱ्याचा नेमकं कारण काय याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. मात्र नेहमीच लावा जमा घेऊन येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी अचानक जिल्हा दौऱ्यावर आल्याने हा दौरा नेमका कशासाठी आहे, नेमकं या दौऱ्या पाठीमागचं कारण काय आहे.याबाबत अध्यापही कोणतीही पुष्टी मिळाली नाही.दुपारी अचानक सातारा प्रशासनाला मुख्यमंत्री येणार असल्याचे कळविण्यात आले. मात्र राज्यभरात राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्र्यांचा अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दौरा याबाबत अनेक राजकीय तर्क वितर्क लढविले जात आहेत.
कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यावर प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकी प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी साताऱ्यातील कोयना जलांशयासह कमी झालेला जलसाठा व त्यामुळे जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची निर्माण झालेली संधी या अनुषंगाने तात्काळ गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्यात यावा यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा अशी सूचना त्यांनी केली.