पुन्हा नवा वाद, प्रकाश आंबेडकरांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन

संभाजीनगर, १७ जून २०२३ ः मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी दंगली झाल्या आहेत. आता यामध्ये आणखी वाद वाढविणारी घडामोड महाराष्ट्रात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली.

राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका असणार आहेत. तसेच पुढच्यावर्षी आधी लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात नेमकं काय-काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात प्रचंड हालचाली घडत आहेत. असं असताना आदिल्यादेवीनगरमध्ये (अहनदनगर) एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत असल्याचे समोरा आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर सह इतर शहरात दंगली झाल्या आहेत. हा वाद कमी झाला असे वाटत असताना आज प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने पुन्हा चर्चेला सुरवात झाली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आले आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगाजेबाला शिव्या कशाला घालता. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होणार नाही. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर, दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय म्हणजे, होऊ देता म्हणून अशी टीका एकनाथ शिंदेवर केली.