पवारांना बीआरएसची भीती वाटते – बावनकुळे यांची टीका
पुणे, १७ जून २०२३: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीआरएसच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीवर भाष्य केलंय.
काँग्रेस-राष्ट्रवादी गोष्ट तयार करत आहे. राजकारणात कोणीही नवं आलं की बी टीम. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती आमची बी टीम नाही. नवीन पक्षाची भीती पवार आणि काँग्रेस ला वाटते.बीआरएसशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं बावनकुळे म्हणालेत.
शहर पवार यांनी नुकतीच बीआरएसवरून भाजप टीका केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रात पाया पक्का करत आहेत. त्यांनी नागपूर येथे कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. मागची निवडणूक आठवली तर थोडा फटका आम्हाला बसला होता. नुकसान सहन करावे लागेल. ते नुकसान वंचितच्या वतीने करण्यात आले. लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे.कुणाल कुठही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात अस दिसतय की स्वत: लढायच असत आणि दुसऱ्या एकदोन टीम तयार करायच्या असतात. पायात पाय घालण्यासाठी याला राजकारणाची बी टीम म्हणतात. ही बी टीम आहे की काय आता कळेल, असे वक्तव्य केले. त्यास आज भाजकडून उत्तर देण्यात आले.
काँग्रेस-राष्ट्रवादी गोष्ट तयार करत आहे. राजकारणात कोणीही नवं आलं की बी टीम. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती आमची बी टीम नाही. नवीन पक्षाची भीती पवार आणि काँग्रेस ला वाटते.बीआरएसशी आम्हाला काही देणं घेणं नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.