जास्त उडू नका दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करेन – सुप्रिया सुळे केंद्रीय राज्यमंत्र्यावर संताप
पुणे, १४ जून २०२३ : बारामती लोकसभा मतदारसंघीतील इंदापूर येथे केंद्र सरकारच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्या चांगल्याच संतप्त झाल्या आहेत.“बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. जास्त उडू नका दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करते. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजप नेत्याला इशारा दिला.
काही दिवसापूर्वी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जल जीवन मिशनचे उद्धाटन केलं. त्यावेळी स्थानिक लोक प्रतिनिधींना आमंत्रण दिले नव्हते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतून येऊन इथे चिखलफेक केली तर आपण दिल्लीत जाऊन उत्तर देऊ इथे आल्यावर अतिथी देवो भवः असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी मोठी राजकीय खेळली. त्यांच्या या खेळीची राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.
खासदार सुप्रिया सुळे यांची आज कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली. त्यांनी संसदेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. ठोस भूमिका घेण्यावर त्यांचा भर असतो. पण, राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती. आता मात्र ही जबाबदारी त्यांना मिळाली आहे. या माध्यमातून त्यांना आता अधिक जोमाने काम करण्याची संधी मिळेल.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप