मुस्लीम, ख्रिश्चनांच्या स्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त करताच राणेंची आक्षेपार्य टीका

मुंबई, ७ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले होते की, देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणे यांनी आक्षेपार्य टिपणी केली. “मला वाटतं कधी कधी शरद पवार हेच औरंगजेब आहेत” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद वाढणार आहे.

शरद पवार आणि नुकतेच एका कार्यक्रमांमध्ये मुस्लिम व ख्रिश्चन धर्माबाबत चिंता व्यक्त केली पवार म्हणाले “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. मात्र, राज्यकर्ते व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यामुळे समाजात जातीत कटुता निर्माण झाली तर हे चांगलं लक्षण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
समाजात कटुता निर्माण केली जात आहे. औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करायचं काय कारण आहे. पुण्यात आंदोलन करायचं काय कारण आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.
लोकांनी एकजुटीने द्वेषाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. देश आणि समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजेमुस्लिम समाजात चार-दोन चुका होऊ शकतात, तशा गोष्टी हिंदूंकडूनही होऊ शकतात. व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणे चूक आहे. असे शरद पवार म्हणाले.

यावर निलेश राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे म्हणाले की, निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. असे निलेश राणे म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप