जोशी, शिंदे, धंगेकर नव्हे तर गोपाळ तिवारींना काँग्रेची उमेदवारी द्या
पुणे, ४ जून २०२३: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरू असताना राजीव गांधी स्मारक समितीतर्फे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांना इमेल करण्यात आले आहे. या पत्रावर पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांची स्वाक्षरी आहे. शनिवारी मुंबई झालेल्या बैठकीत नाना पटोले यांना देखील हे पत्र देण्यात आले आहे.
काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि कसबा पोटनिवडणुकीत विजय झालेले आमदार रवींद्र धंगेकर हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, आता अचानकपणे गोपाळ तिवारी यांच्या नावाची मागणी समोर आलेली आहे. गोपाळ तिवारी हे पुण्यातील कलमाडी गटाचे विरोधक म्हणून ओळखले जातात. कलमाडींच्या विरोधात दंड थोपटल्याने काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातून त्यांना बाजूला काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सदाशिव, नारायण, शनिवार पेठ या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा जुना कार्यकर्ता म्हणून तिवारी यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते राजीव गांधी स्मारक निधी याच्या माध्यमातून विविध उपक्रम कार्यक्रम राबवत आहेत. आता याच संस्थेच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवून त्यांनी स्वतःचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच कसाब विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा अनेक वर्षानंतर विजय झाला. त्यामध्ये गोपाळ तिवारी यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून (सदाशिव पेठ नारायण पेठ ) भाजपचे मताधिक्य कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
काँग्रेसमधील अनुभवी व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांस उमेदवारी द्यावी अशी मागणी या पत्रात केली आहे.
या पत्रावर अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, पुण्याचे प्रथम महापौर, पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष व आमदार स्व बाबुराव सणस यांचे चिरंजीव व माजी उपमहापौर जेष्ठ काँग्रेस नेते मधुकर सणस, शहर काँग्रेस उपाध्यक्ष व अर्बन बँकेचे संचालक सुर्यकांत मारणे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष थोरवे, कबड्डी संघाचे राष्ट्रीय कोच रामचंद्र शेडगे, पुणे गणेशोत्सव संधटनेचे अखील मंडई मंडळांचे भोला वांजळे, वकील सेल चे ॲड संदिप ताम्हणकर, इंटक नेते व ॲड फैयाझ शेख, पीएमपीएमएल कामगार संघटना (इंटक) अध्यक्ष राजेंद्र खराडे, युक्रांदचे उपाध्यक्ष संदिप बर्वे, पुणे जनसंघर्ष समितीचे ॲड रविंद्र रणसिंग, समाजवादी नेते प्रा विकास देशपांडे, पुरोगामी लेखीका ॲड मनिषा पाटील, लायन्स क्लब पुणे सिटी चे अध्यक्ष नंदकुमार पापळ, पुणे जिल्हा मेडीकल डीस्ट्रीब्युटर्स असो चे माजी अध्यक्ष व व्यापारी सेल चे उपाध्यक्ष श्री प्रसन्न पाटील, ‘नोइंग गांधीझम पुणे’चे गणेश चोंधे, ऊमेश ठाकुर, संजय मानकर, श्री लकडीपुल विठ्ठल मंदीर चे विश्वस्त व ओबीसी संधटनेचे पदाधिकीरी महेश अंबिके, पै शंकर शिर्के यांचे सह राजीव गांधी स्मारक समितीचे सक्रीय कार्यकर्ते व जेष्ठ व तरूण कार्यकर्ते.. काँग्रेसन संभाजीराव पायगुडे, मुळशी काँग्रेस अध्यक्ष सुरेश पारखी, महापाष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संधटनेचे नेते श्री हरीभाऊ वाधुलकर गुरुजी, श्री धनंजय भिलारे, श्री प्रशांत(मामा) जाधव, संजय अभंग, आण्णा गोसावी, ॲड राजेंद्र काळेबेरे, घनश्याम निम्हण, संजय मोरे, ॲड शिवाजी भोईटे, सौ छाया जाधव, संगिता पवार, नलीनी दोरगे इ सह ४५ जणांची स्वाक्षरी आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत या पत्राचे निवेदन नाना पटेल यांना देखील देण्यात आले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप