संरक्षण सोडून ये, तुला अस्मान दाखवतो – शहरप्रमुख संजय मोरे यांचा नितेश राणेंना आव्हान
पुणे, २१ मे २०२३: दुसऱ्यांचे संरक्षण काढा म्हणण्यापेक्षा अगोदर सरकारी आणि तुझे बिनसरकारी संरक्षण सोडून ये. समवयस्क निष्ठावंत शिवसैनिक तुला तुझ्याच भाषेत कुस्तीच्या आखाड्यात अस्मान दाखवतील
एकदा होऊन जाऊ देत. म्हणजे कायमची वायफळ बडबड बंद होईल, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय मोरे यांनी नितेश राणे यांना दिला.
काँग्रेसमध्ये असताना स्वाभिमान गहाण ठेवलेल्या आणि भाजपात जाऊन स्वाभिमान विकलेल्या चाराणेंनी शिवसैनिकांना शिकवू नये. तू शिवसैनिक होतास भूतकाळात. आम्ही भूत वर्तमान आणि भविष्य काळातही शिवसैनिकच आहोत आणि कायम राहू, असे सांगत ‘विचारत नव्हते कुणी, टाकत नव्हते दाणे, विकून टाकला स्वाभिमान, किंमत उरली चा राणे … अशा शब्दांत मोरे यांनी ठणकावले आहे.
संजय मोरे म्हणाले, भाजपच्या राज्यस्तरीय विचारत नव्हते कुणी, टाकत नव्हते दाणे, विकून टाकला स्वाभिमान’, किंमत उरली चा राणे’ बैठकीला नितेश राणे उपस्थित होता. त्यावेळी महिला पत्रकार यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कपडे बदलता तसे पक्ष बदलता, अशा विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देता आले नाही.
छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढताना आरएसएसला उद्देशून हाफ चड्डी म्हणालेला नितेश राणे आता भाजपमध्ये जाऊन हिंदुत्वाचे गाणे गाऊ लागला असल्याचा टोला मोरे यांनी लगावला आहे. नीतिमत्ता नसलेल्या नितू नारू तातू राणेला पुणेकर पत्रकारांना उत्तर देता येत नाही. विषयांतर करण्यासाठी वडीलधारे ज्येष्ठ नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना पोलीस संरक्षण सोडून येण्याचे आणि त्यांचे पाय मोडण्याची भाषा करून आव्हान देणाऱ्या, तसेच पुणे शहराची शांतता भंग करणाऱ्या नितेश राणेंवर राज्य सरकार कारवाई करणार का? असा सवाल करीत याबाबत किमान विचारविनिमय करतील की नाही, अशी शंका मोरे यांनी उपस्थित केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच झोपा काढत आहेत. त्यांचा बोलबच्चन आमदार खुलेआम धमकी देत असताना त्यावर कारवाईची हिंमत फडणवीसांमध्ये आहे का, असा सवालही मोरे यांनी केला. इतर पक्षांतील आमदार, पदाधिकारी ह्यांनी अशी भाषा वापरली असती तर त्यांच्यावर हक्कभंग, कारणे दाखवा नोटीस, पोलीस तक्रार असे प्रकार झाले असते, ह्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे आणि गृहमंत्रीपदाची गरिमा
टिकवावी, असे आव्हानदेखील मोरे यांनी दिले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप