आम्ही केलेल्या कायद्यामुळेच बैलगाडा शर्यतीची बंदी उठली – देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रतिक्रिया

पुणे, १८ मे २०२३: सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती बंदी उठवत त्याचा कायदा मान्य केल्याने भाजप निर्णयाचे स्वागत करत आम्ही केलेला कायदा न्यायालयाने ठरवला हा महाराष्ट्राचा जनतेचा शेतकऱ्यांचा विजय आहे अशा शब्दात या निर्णयाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा अतिशय प्रतिष्ठेचा खेळ आहे. मात्र बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान बैलांवर अमानुष अत्याचार केले जातात त्यामुळे या विरोधात प्राणी मित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी देखील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली होती. मात्र, त्यामध्ये नियमांचा भंग होत असल्याचे लक्षात आल्याने ती बंदी कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.
महाराष्ट्रामध्ये २०१९ पूर्वी भाजपची सत्ता असताना त्यावेळी चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून बैल हा धावणारा प्राणी आहे असा अहवाल सेटल जनरल यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला होता. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आज ग्राह्य धरून बैलगाडा शर्यतीस मान्यता दिलेली आहे.

पुण्यात प्रदेशकार्य समितीच्या बैठकीसाठी फडणवीस आज पुण्यात आलेले असताना ते म्हणाले, “बैल हा धावणारा प्राणी आहे. असा अहवालसर्वोच्च न्यायालयामध्ये सॉलिसिटर जनरल यांनी हा सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने हा तयार केलेला कायदा पूर्णपणे वर्ग ठरलेला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत पूर्णपणे चालणार आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे. आम्ही सगळे आनंदी आहोत, या कारवाईच्या दरम्यान आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, राहुल कुल यांनी प्रचंड मेहनत घेतली पाठपुरावा केला. हा महाराष्ट्राचा विजय आहे अनेक लोकांनी यामध्ये सर्वांचे मी आभार करतो.