कर्नाटकाच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची खलबत, वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होणार
मुंबई, १४ मे २०२३: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा एकतर्फी धुवा उडवल्यानंतर देशाच्या राजकारणात मूठ फेरबदल होणार अशा चर्चेला उधाण आलेले आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित मोट बांधून पुढील निवडणूक लढवण्यासाठी तयारी चालू केलेली आहे. यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्ष बाबतचा निकाल यावर चर्चा झालीच तसेच वज्रमूठ सभा स्थगित केल्या होत्या. त्या पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, माजी आमदार नसीम खान उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या १०६ आमदारांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी आणि चार नंबरला काँग्रेस पक्ष होता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्यांचे ५६ पैकी ४० आमदार हे भाजपसोबत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीमध्ये आलेले आहेत. भाजपला सध्या १७८ आमदारांनी विधानसभेत पाठवा दिलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्याचे भाजपचे स्वप्न असताना महाविकास आघाडीचे शक्ती त्यांना रुखावी लागणार आहे.
महाराष्ट्र मध्ये झालेल्या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती लाभलेली आहे. ही सहानुभूती मतांमध्ये परिवर्तन केल्यास महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळू शकतात असा एक अंदाज वर्तुळ जात आहे. मात्र आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात आहे. कर्नाटक मधील निकालामुळे भाजपचा पराभव होऊ शकतो हा मतप्रवाह समोर आल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अपेक्षा उंचावलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करून राज्यातल्या परिस्थितीवर चर्चा केली. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीकडून कशी पावली उचलली जातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बैठक झाल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “आजच्या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं यश आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दलचा सुप्रिम कोर्टाने दिलेला निकाल याविषयी चर्चा झाली. याबरोबरच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याला आम्ही ठोस पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. “कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा आजच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला. कर्नाटकमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सक्षम पर्याय देण्यावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं आहे. आघाडीतील तिन्हीही पक्ष एकसंधपणे लढणार आहोत. आगामी निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात आमच्यासोबतच्या घटक पक्षांबरोबर देखील चर्चा करणार आहोत”, असं जयंत पाटील म्हणाले.