Uddhav Thackeray in Rajapur; Met the protestors

उद्धव ठाकरे राजापूर मध्ये; आंदोलकांची घेतली भेट

राजापूर, ६ मे २०२३ : रत्नागिरीतल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे आज राजापूर दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवाना केलेली असताना उद्धव ठाकरे यांनी तेथे जाऊन आज नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले.

 

बारसूमधील रिफायनरी याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच नाराणय राणे यांनी दिलेल्या आव्हानावरही भाष्य केलं.

 

लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, जर बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३३ देशात गद्दार म्हणून ओळख झाली आहे. आमच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांना महाराष्ट्रातले तीन जिल्हेसुद्धा ओळखत नव्हते, असे ते म्हणाले.