राजेश पांडे यांना बढती, काकडे, तापकीर यांना वगळले; भाजपने भाकरी फिरवली
पुणे, ३ मे २०२३ : भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी जाहीर केली असुन त्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केली आहे. त्यात भाकरी फिरविण्यात आली आहे. त्यात पुणे शहर भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना बढती देउन प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले आहे. गेल्या कार्यकारणीत राज्य उपाध्यक्ष असेलले माजी खासदार संजय काकडे आणि वर्षा तापकीर यांना नव्या कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची राज्य कार्यकारीनी जाहीर केली. संजय भेगडे , अमर साबळे, राजेश पांडे यांची उपाध्यक्षपदी तर वर्षा डहाळे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे.
गेल्या कार्यकारणीत राज्य उपाध्यक्ष असेलले माजी खासदार संजय काकडे यांना उपाध्यक्षपदावरून पायउतार करून विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे. तीनवेळा नगरसेविका राहिलेल्या वर्षा तापकीर या गेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष होत्या. त्यांनाही नव्या कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर संधी हवी होती. मात्र, ती न मिळाल्याने त्यावेळी त्या नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. पण तापकीर यांचे नाव वगळण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिपक मिसाळ, राजेद्र शिळीमकर, जयंत भावे यांना विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे. गणेश बिडकर, बापु पठारे, सुशिल मेंगडे, अली दारूवाला, कुणाल टिळक, संजिवनी पाडे, उषा वाजपेजी, शरद ढमाले, सचिन पटवर्धन यांना निमंत्रतामध्ये संधी देण्यात आली आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप