शरद पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, निवृत्तीचे दिले संकेत
मुंबई, २ मे २०२३ : गेल्या ५० वर्षापासून अधिक काळापासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असणारे आणि राजकीय घडामोडींमध्ये स्थापन करण्याची क्षमता असणारे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात राजकीय स्थिती अस्थिरतेची असताना आज पवार यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद ते सोडणार असून तीन वर्षानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही ते कोणते पद घेणार नाही असे स्पष्ट केले आहे.
खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होतं. आज या पुस्तकाचा दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन कार्यक्रमाला स्वतः शरद पवार, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर अरुण गुजराती, हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडणार असल्याची घोषणा केली. पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी महीयती त्यांनी दिली.
शरद पवार म्हणाले, माझी निवृत्ती सार्वजनिक जीवनातून नाही. या आधीही मी संशोधन, कृषी, शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. यापुढे देखील मी त्या क्षेत्रात काम करत राहील अशी घोषणा त्यांनी केली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप