अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपानं लिहिली होती – सुषमा अंधारे यांचे धक्काकायक विधान

मुंबई, १९ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपा पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. पण यावर आता अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपानं लिहिली होती, धक्कादायक विधान शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपानं लिहिली आहे. ‘वज्रमूठ’ सभा आणि खेड व मालेगाव येथील सभांमधून महाविकास आघाडीला जो वाढता प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे भाजपाला भीती वाटत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची अलीकडची विधानं आपण तपासून बघितली, तर ती विधानं पुरेशी बोलकी आहेत. आधी त्यांनी काय विधानं केली आणि नंतर काय विधानं केली. या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस कमालीचे मौन बाळगून आहेत. पण त्यांचं हे जे मौन आहे, हेच खरं रहस्यमयी आहे. त्यामुळे कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे, अजित पवारांच्या नाराजीनाट्याचा ‘स्क्रिप्ट रायटर’ कोण आहे? याचं उत्तर फडणवीस चांगल्याप्रकारे देऊ शकतात.

नाराजीनाट्याबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण या निमित्ताने शिंदे गटातील बोलघेवडे लोक उघडे पडले आहेत. त्यांची अजित पवारांबाबतच्या घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखुचा बार भरून बोलतात, असं दिसतं. पण महाविकास आघाडी अभेद्य आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप