महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ; अजित पवार नवे मुख्यमंत्री ?

मुंबई, १६ एप्रिल २०२३ : सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे पुढील एक ते दोन आठवड्यात हा न्यायालयाकडून हा निर्णय जाहीर केला जाईल त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबरदस्त झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे फडणवीस सरकार धोक्यात येणार असल्याने त्याऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील अशा चर्चेला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात मुंबई आणि दिल्लीमध्ये देखील महत्त्वाच्या घडामोडी घडल्याचे हे सूत्राने सांगितले.

राज्यामध्ये नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 40 पैकी 16 जणांवर पक्षांतर बंदी नुसार अपात्रतेची कारवाई प्रस्तावित केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू होती, मार्च महिन्यामध्ये सलग दीड आठवडा सुनावणी होऊन या विषयावर मंथन झालेले आहे. नेमकी चुकी उद्धव ठाकरे यांची ही भाजपने घडून आलेला सत्ता बदल बेकायदेशीर यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठ निर्णय देणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होऊ शकतात अशीच चर्चा सुरू झालेली आहे. न्यायालयातील युक्तिवादाने व सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाने वेळोवेळी व्यक्त केलेली मत याच दिशेने जाणारे आहेत. त्यामुळे या सत्ता संघर्षात निर्णय काय येणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आगामी दीड ते दोन आठवड्यामध्ये जाहीर होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 16 जणांना अपात्र ठरविल्यास राज्यातील सरकार कडून राजकीय उलथापालच होणार आहे. त्यासाठी राज्यातील राष्ट्रीय घडामोडींना गेल्या काही दिवसांपासून वेग आलेला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट भाजप सोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन करेल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील अशी चर्चा सुरू आहे. आठ एप्रिल रोजी अजित पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द करत अचानक अज्ञात स्थळी जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार गायब झाल्याने नेमके काय झाले यावर दिवस व रात्रभर चर्चा सुरू होती. पवार यांनी त्यांना पित्ताचा त्रास झाल्यामुळे आराम करत असल्याचे सांगितले मात्र, पवार हे खाजगी विमानाने दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील सोबत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येण्याचे संकेत दिले जात आहेत.

 

मंत्रालयातील कारभार ठप्प

एकनाथ शिंदे यांचे सरकार कोसळण्याची चर्चा सुरू झालेली असताना त्याचा परिणाम मंत्रालयातील कारभारावर ही झाल्याचे दिसून येत आहे. सर्वच खात्यातील निविदा प्रक्रिया महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात आलेले आहेत. अधिकाऱ्यांना काही दिवस थांबा अशा सूचना दिल्या जात आहेत. एकादशी स्थिती पाहता राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.