राहुल कुलांच्या मतदारसंघात झळकले राऊतांच्या आभाराचे फलक
पुणे, १७ मार्च २०२३ :हश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा दावा नुकताच केला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष, भाजपचे आमदार राहुल कुल यांनी केलेला हा घोटाळा ५०० कोटींचा असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यावर राहुल कुल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. आता या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे.
पाचशे कोटी मनी लाँड्रींगवर राहुल कुल यांचे स्पष्टीकरण; “राऊतांनी राजकीय आकसापोटी..”
राऊतांनी कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राऊतांच्या विरोधात दौंडमध्ये मोर्चा निघाला होता. आता पुणे-सोलापूर महामार्गावर दौंडमध्ये आता राऊतांच्या आभारांचे बॅनर झळकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे बॅनर कुणी लावले हे मात्र गुलदस्त्यात आहे.
“कर नाही तर डर कशाला चौकशीला सामोरे जा,” ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीनं जाहीर आभार, अशा अशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी दौंड शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देखील बॅनर लावले आहेत. बॅनरवर भीमा पाटसचे सुज्ञ शेतकरी असे म्हटलं आहे.
राऊतांनी केलेले आरोप कुल यांनी फेटाळले आहेत. “राजकीय आकसापोटी, सुडबुद्धीनं राऊतांनी हे आरोप केले आहेत, ” असे कुल म्हणाले.”गेल्या २२ वर्षांपासून मी भीमा सहकारी कारखान्याचा अध्यक्ष आहे. कारखाना अडचणीत असताना मी वैयक्तीकरित्या कारखान्याला आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. राऊतांनी केलेले आरोप खरेच असतात असे नाही, मी योग्य ठिकाणी याबाबत माझी बाजू मांडणार आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे राऊतांनी हे आरोप केले आहेत,” असे कुल यांनी सांगितले.
“या प्रकरणाचाही तपास भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांनी करावा, अशी विनंती राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सहकार आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. या कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकर समितीचेही अध्यक्ष आहेत. या समितीने संजय राऊतांना आतापर्यंत हक्कभंगाची नोटीस बजावली आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप