महाराष्ट्र: अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 40 दिवसांनी लागला मुहूर्त
मुंबई, ९ ऑगस्ट २०२२: शिवसेनेचे आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारला तब्बल 40 दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मुहूर्त मिळाला आहे. हे मंत्रिमंडळ विस्तार करताना वादग्रस्त ठरलेले संजय राठोड अब्दुल सत्तार या शिंदे गटातील आमदारांची देखील वर्णी लावण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये अडीच वर्षांपूर्वी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे राज्य सरकार स्थापन झालेले होते. तर सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेली होती. गेल्या दोन वर्षापासून भाजपकडून सरकार पाडण्याचे विविध प्रकारे प्रयत्न सुरू होते. अखेर जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अनपेक्षित पणे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून जोरदार धक्का दिला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून राज्याचा कारभार सुरू असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने त्यांच्यावर टीका होत होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत शिंदे सरकार टिकणार की पडणार याचा फेसला होणार होता पण आतापर्यंत तीन वेळा पुढील तारीख देण्यात आलेली असल्याने व न्यायालयाने निर्णय लगेच न दिल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे नऊ आणि भाजप गटाचे नऊ अशा 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज सकाळी शपथ दिली.
मंत्रीमंडळाची यादी पुढीलप्रमाणे
#शिंदेगट
दादा भुसे
संदीपान भुमरे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
शंभुराजे देसाई
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
संजय राठोड
–
भाजप
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखेपाटील
सुधीर मुनगुंटीवार
गिरीष महाजन
सुरेश खाडे
अतुल सावे
मंगलप्रभात लोढा
विजयकुमार गावीत
रवींद्र चव्हाण