कसब्याची जनता भाजपची गुलाम नाही – सुनील केदार

पुणे, २१ फेब्रुवारी २०२३ : गेली ३० वर्षे भाजपाची पकड व वर्चस्व असलेल्या कसबा मतदार संघातील जनता यंदा ‘आम्ही गुलाम नाही’ हे दाखवून देतीलअसा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे व्यक्त केला.

कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले असता कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ही पोटनिवडणूक म्हणजे उमेदवार निवडून आला किंवा नाही आला त्यामुळे सरकारवर फरक पडणार नसला तरी कलुषित झालेल्या सामाजिक व राजकीय वातावरणाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रिंगणात उभी ठाकली आहे, असे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या नागपूरमधील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमध्ये भाजपाचे झालेले पानिपत यामुळे संघाचे हेडक्वार्टर व भाजपा राज्यातील व देशातील प्रमुख नेत्यांचा जिल्हा म्हणून नागपूरची ओळख आहे. हा घाव त्यांना वर्मी लागला असल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून भाजपचे सगळेच राज्यातील व देशातील नेते पुण्याकडे येत आहेत. असे ते म्हणाले.

कसब्यामध्ये मागील तीस वर्षापासून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही येथील पाणी प्रश्न सुटला नाही हे भाजपाचे अपयश आहे. असे ते म्हणाले.

पुणे शहराला क्रीडा विद्यापीठ देण्याचा निर्णय महाविकास सरकारने घेतला. पुण्याचे महत्त्व व देशातील स्थान लक्षात घेता पुणेकर नेहमी बदलाला प्राधान्य देतात. कसब्यामध्येही पुणेकर जनता त्याचा प्रत्यय घडवतील असा मला आत्मविश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप