मुख्यमंत्री असेल म्हणजे नियम पाळणार नाही का? अजित पवार यांची टीका

बारामती , ६ आॅगस्ट २०२२: आम्ही जेव्हा पदावर असतो, तेंव्हा आम्ही नियम मोडून चालत नाही. नियमाने रात्री दहाच्या पुढे लाऊड स्पीकर बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री फिरत असताना रात्री दीड-दोन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतो. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारी अधिकारी व्यक्तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उशीरापर्यंत होत असलेल्या दौऱ्याबाबत टोला लगावला.

 

सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष गट वाढवण्याचे अधिकार आहे. मात्र, संविधानाने सांगितलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. मग ती सामान्य व्यक्ती असो की उच्चपदस्थ,प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.

 

पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर

चौफेर टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार करीत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. या दोघांवर इतका भार आला आहे की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले आहेत. हे मी चांगल्या भावनेने नमुद करत आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचे पवार म्हणाले.मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता तर संबंधित मंत्री आपापल्य ाभागात काम करत राहिले असते. पूर

परिस्थितीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सचिव आम्हाला आदेश पाहिजे, असे सांगतात.मात्र आदेश देणाऱ्या सर्व खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांच्याकडेही अद्याप कुठलेही खाते नसल्याचे पवार यांनी सांगितले.

 

..त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं कदाचित याबाबत निकाल काय लागेल माहित नसल्याने मंत्री मंडळ विस्तार होत नाही की कायअशी शंका येत असल्याचे सांगितले. बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे. त्यामुळे देखील विस्तार होत नसेल.यामुळे कोणाला मंत्री, कोणाला राज्यमंत्री तर भाजपच्या ही १०६ आमदारांना वाटतं की आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एकतर त्यांना मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.