सुधीरभाऊंच्या हस्ते पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरण
पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023: शिक्षणासाठी सायकल मिळाल्या, आता शिक्षणक्षेत्रात उंच भरारी घ्या, असे आशीर्वाद वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना दिले. पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करतांना वन भवन येथे ते बोलत होते.
“पूना सायकल फॅक्टरी” ने 10 हजार सायकल्स विक्रीचा टप्पा पूर्ण केल्यानिमित्त कंपनीतर्फे या सायकल्स निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता देण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यार्थी ओमकार शिंदे सम्राट अशोक विद्यामंदिर, राहुल शिंदे, शानू पटेल सुजाता पवार,महर्षी कर्वे देवीबाई राठोड, सानु पटेल आदर्श साबळे न्यू इंडिया स्कूल (सर्व राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी कोथरूड) या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः सायकल चालवली आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारत संवाद साधला. त्यांच्या शाळेसंदर्भात व त्यांच्या परिवाराविषयी मा.श्री सुधीरभाऊंनी आपुलकीने विचारपूस केली, तसेच सायकल व इतर कुठलेही वाहन चालवतांना नेहमी वाहतुक नियमांचे पालन करावे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या सायकलप्रदान कार्यक्रमावेळी कंपनीचे संचालक केदारदादा खडके, सुनीलजी जाचक व चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आकाशदादा वानखेडे, तसेच भाजपा कामगार आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष श्री. जयेश दादा शिंदे, कोथरूड मतदार संघाचे भाजपा झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष श्री बाळासाहेब दांडेकर, वनसंरक्षक श्री. N.R. प्रवीण साहेब व वन विभागाचे इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. भाजपा प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीअण्णा मोहोळ यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना हे सायकल वाटप करण्यात आले.