“टिळक भाजपशी एकनिष्ठ राहतील” – चंद्रकांत पाटील यांना विश्‍वास

पुणे, ४ फेब्रुवारी २०२३: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पती ऐवजी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता टिळक कुटुंब काय भूमिका काय करणार अशी चर्चा सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिळक कुटुंबिय भाजपशी एकनिष्ठ राहणार असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

टिळक यंच्या निधाननंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपतर्फे शैलेश टिळक, कुणाल टिळक, हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे हे इच्छुक होते. यापैकी शैलेश टिळक व रासने यांच्यात सर्वाधिक स्पर्धा होती. टिळक यांना उमेदवारी देणे योग्य नसल्याचे भाजपच्या सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी टिळक यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली त्यनंतर रासने यांना उमेदवारी जाहीरक केल आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलतताना पाटील म्हणाले, “शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”

दरम्यान, जगताप कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. याबाबत विचारलं असता, “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विन जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप