मोदी फडणवीस विरोधातील ‘महाराष्ट्र सन्मान’ परिषदेचा पुण्यात शुभारंभ, महाविकास आघाडीसह समविचारी संघटना सहभागी

पुणे, ३ फेब्रुवारी २०२३ : बहुजनांच्या महापुरूषांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधासाठी,बहुजनांच्या महापुरूषांना बदनाम करून त्यांचे विचार जनतेतून संपविण्याचा भाजपचा मनुवादी डाव हाणून पाडण्यासाठी, मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगार असलेल्या तरूण-तरूणींसाठी आणि नोकऱ्या गेलेल्या २ कोटी मध्यम वर्गीयांसाठी ही परिषद आहे, असे संगत महाराष्ट्र सन्मान परिषदेचा पुण्यात सुभारंभ झाला.

ज्येष्ठ कामगार नेते मा.डॉ. बाबा आढाव हे या परिषदेचे अध्यय होते. माजी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड,शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे , सुप्रसिद्ध शाहिर संभाजी भगत ,सुप्रसिद्ध शिवव्याख्यात्या वैशाली डोळस या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र सन्मान परिषदेचा उद्देश सांगताना डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “महाराष्ट्र सन्मान परिषद कशासाठी तर , छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या बहुजनांच्या महापुरूषांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधासाठी,बहुजनांच्या महापुरूषांना बदनाम करून त्यांचे विचार जनतेतून संपविण्याचा भाजपचा मनुवादी डाव हाणून पाडण्यासाठी,महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात असताना सत्तेसाठी मूग गिळून गप्प बसणाऱ्या ‘महाराष्ट्रद्रोही’ सरकारविरोधासाठी,पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडरचे प्रचंड दर आणि जीएसटीमुळे गगनाला भिडलेली महागाई यामुळे होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी परिवारांसाठी,नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊनमुळे उध्वस्त झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगार असलेल्या तरूण-तरूणींसाठी आणि नोकऱ्या गेलेल्या २ कोटी मध्यम वर्गीयांसाठी ही परिषद आहे.

एकीकडे सर्वसामान्यांवरचे करांमध्ये प्रचंड वाढ आणि दुसरीकडे देशातील धनदांडग्यांना करमाफी व कर्जमाफी देणाऱ्या केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात आमचा एल्गार आहे.या देशाची साधनसंपत्ती, सरकारी उद्योग मोजक्या देशी-विदेशी कंपन्यांना कवडीमोल भावात विकण्याऱ्या धोरणांच्या विरोधात जर आज आवाज उठवला नाही तर उद्याची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.

ज्या पद्धतीने उत्तरप्रदेशातील उन्नाव, हाथरस बलात्कार ते कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष असलेल्या भाजप खासदाराने महिला खेळाडूंचे केलेले लैगिंक शोषण या सर्व घटनांमध्ये बलात्काऱ्यांना संरक्षण देण्याच्या भाजपच्या पुरुषसत्ताक वृत्तीला बळी पडलेल्या महिलांसाठी हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.विविधतेतील एकतेच्या संस्कृतीला तडा देत भाजपने सत्तेची पोळी भाजण्यासाठी देशामध्ये धर्माधता- जातीयता पसरविल्यामुळे प्रचंड दहशतीत जगत असलेल्या अल्पसंख्यकांसाठी आणि दलितांसाठी लोकशाही व्यवस्थेतील प्रत्येक संस्था ताब्यात घेत आणि ईडी, आयकर विभागच्यामार्फत या देशात हुकूमशाही आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात या मनुवादी आणि धनदांडग्यांच्या सरकाराला उघडे पाडण्यासाठी आमचा हा लढा आहे.

या देशातील लोकशाही, अखंडता, प्रेम, अहिंसा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या महापुरूषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि पुन्हा एकदा ‘रयतेचे राज्य’निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना प्राणप्रिय असलेल्या भारतीय संविधानासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ‘महाराष्ट्र सन्मान परिषद’ सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन केले .

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्ताविक प्रशांत जगताप,सूत्र संचलन प्रदीप देशमुख तर आभार बबलू जाधव यांनी केले.
कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, यशवंत नडगम, संतोष शिंदे, वसंतराव साळवे हे उपस्थित होते.