भाजपला मोठा धक्का;नागपूरमधून महाविकास आघाडीचे अडबाले विजयी

नागपूर, ३ फेब्रुवारी २०२३ : विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत.

 पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती,
फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजण्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. नागो गाणार हे भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. मागील दोन टर्म गाणार हे आमदार होते. ते हॅटट्रिक करतील, असं सांगितलं जात होतं.

परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. नागपूरमधली सहा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल ८६.२६ टक्के मतदान झाले होते.
३९ हजार ८३४ मतदारांपैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदान केलेलं. आज निकाल हाती येताच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्याच बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराचा परभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन सांगितलं की, भाजप मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजीय.. असं ट्विट पटोलेंनी केलं आहे.