आघाडी सरकारचा ‘राजकीय जिहाद’ न्यायालयात टिकू शकला नाही – धनंजय देसाई
पुणे, २७/०१/२०२३: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फेसबुकवरील अवमान प्रकरणानंतर तत्कालीन महाविकास आघाडीला जिहादी मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी अशा प्रकारची खोटी कारवाई करणे गरजेचे होते. त्यानुसार त्यांनी खरे आरोपी सोडून आम्हाला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. पाच वर्षे कारागृहात आम्ही बंदिस्त असताना, आमच्याबाबत वेगवेगळे खोटे आरोप जाणीवपूर्वक पसरवून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आघाडी सरकारचा ‘राजकीय जिहाद’ न्यायालयात टिकू शकला नाही आणि आमची निर्दोष मुक्तता करण्यात आली असे मत हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचे धनजय देसाई यांच्यासह २१ जणची न्यायलयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते.
देसाई म्हणाले, देशात बांगलादेशींची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असून ते वेगवेगळ्या शहरात कार्यरत झाले आहे. त्यामुळे आम्ही देशाभिमान जागृत करण्यासाठी विविध ठिकाणी जनजागृती करत होतो. याचा गैरफायदा आघाडी सरकारने घेऊन आम्हाला जाणीवपूर्वक षडयंत्र रचून या गुन्ह्यात अडकवले आणि हिंदू कुटुंबांना वेठीस धरले. सदर गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करण्यापूर्वीच, आरोपी निश्चित करण्यात आले होते. त्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून समर्थन केलेले होते. हिंदुराष्ट्र सेनेचे कोणतेही कार्यकर्ते मोहसीन शेख खून प्रकरणात सहभागी नव्हते. या पुण्यातील साक्षीदारांनीही न्यायालयात आम्ही संबंधित कोणत्याही कार्यकर्त्यांना घटनेच्या दिवशी पाहिली नसल्याचे साक्ष न्यायालयात नोंदवली आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या प्रकरणाची केस हातात घेतल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्रे पाहिल्यावर हा गुन्हा न्यायालयात टिकू शकणार नाही याची खात्री पटल्याने त्यांनी या केसमधून माघारी घेतली.
पुढे ते म्हणाले, यापुढे आमची लढाई ही भारताचे हिंदू राष्ट्र घोषित करणे याची राहणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने विभागणी करण्यात आलेली आहे. जो भारताला पुण्यभूमी ,मातृभूमी मानतो तो भारतीय अशी आमची धारणा आहे. केंद्रात राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता सत्तेवर आहे, हे आम्हाला महत्त्वाचे नाही तर धर्माधिष्ठ सत्ता सन्मानाने असणे महत्त्वपूर्ण आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे स्वकीय धर्म नसून ते बाहेरून आलेले आहेत. देशात हिंदू विरोधी मोठे षडयंत्र सुरू असून विदेशातून देशात हिंदू विरोधी कारवाई करण्यासाठी मोठा निधी येतो हे थांबवले गेले पाहिजे. मशिदी वरील भोंगे हा विषय सामाजिक नसून धार्मिक आहे आणि त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जावे असे माझे मत आहे.