कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख बदलली

पुणे, २५ जानेवारी २०२३ : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी आता २७ फेब्रुवारी २६ फेब्रुवारी मध्ये रोजी मतदान होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रचाराचा कालावधी एक दिवस कमी झाला असून इयत्ता बारावीच्या परीक्षेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या होत्या.
त्यामध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल असे स्पष्ट करण्यात आलेले होते.

एकीकडे ही निवडणूक होत असताना दुसरीकडे इयत्ता बारावीच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. मतदानामुळे या दोन्ही मतदारसंघातील शाळा ताब्यात घ्याव्या लागणार असून तेथे इतर कोणालाही प्रवेश असणार नाही. त्यामुळे परीक्षेच्या कामावर परिणाम होणार आहे. पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे हवलात नमूद केले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.