भाजपच्या उमेदवारांची नावे अजित पवारांनी सांगितली

पिंपरी, २१ जानेवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून विठ्ठल काटे यांनी इच्छुक म्हणून नाव पुढे आणलेले असताना अजित पवार यांनी मात्र आज भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू किंवा पत्नी यांच्याकडेच उमेदवारी म्हणून नावाची चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले. मात्र, भाजप कोणाला उमेदवारी देणार हे अध्यक्ष स्पष्ट नाही अशी गुगली टाकली त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीची भूमिका काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सर्व विधी होऊनही काही दिवस झाले असताना लगेच निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. ही पोट निवडणूक एवढ्या लवकर जाहीर होईल अशी अपेक्षा नसतानाही तारीख जाहीर झाल्याने सर्वच पक्षांचा राजकीय गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे राष्ट्रवादी उमेदवार देणार अशी चर्चा सुरुवातीपासून आहे.

राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे यांनी लढविण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या गाठीभेटी सुरू केलेले आहेत. या संदर्भातील एक बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात देखील झालेली आहे. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे काटे यांनी स्पष्ट केले.
काटे यांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना आज अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधून पोट निवडणूक साठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू किंवा पत्नीला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांच्या पतीला तिकीट दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो या अवस्थेत करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.