आरोग्य अधिकाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

पुणे, १६ जानेवारी २०२३ : जवळपास सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तम रीतीने सेवा प्रदान करीत असून राज्याच्या आरोग्यवस्थेला देशात तिसऱ्या क्रमांकावर आणण्यामध्ये या सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे मोलाची योगदान
आहे. प्रामाणिकपणे आपले सेवा प्रदान करीत असताना समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व आर्थिक नुकसान आमचे मनोबलाचे खच्चीकरण करीत आहेत, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी राज्यभरातील जवळपास दहा हजार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या अग्रक्रमाने सोडविणे आवश्यक आहे . याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज 16 जानेवारी रोजी एक दिवस काम बंद आंदोलन केले आहे. सरकारने 23 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले जाईल या राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या
खालील प्रमाणे.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करुन गट ‘ब’ अधिकाऱ्यांचा दर्जा मिळणेबाबत सदर योजनेकरिता केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहा वर्षे झाल्यानंतर राज्य शासनाने समुदाय आरोग्यअधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासंदर्भात सुस्पष्ट उल्लेख असतांना देखील सेवेची सहा वर्षे पूर्ण झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासंबंधीकुठलीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. सदर योजनेचा पथदर्शी प्रकल्प जानेवारी २०१७ साली नाशिक आणि पालघर या जिल्ह्यामध्ये प्रारंभ झाला होता या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत नियुक्ती करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायम करण्यात आलेली नाही. आपणास विनंती करण्यात येते की सहा वर्ष सेवा पूर्णत्वानंतर सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शासकीय सेवेत कायम करण्याची कार्यवाही करण्यात यावी. समुदाय आरोग्य अधिकारी उच्चशिक्षित असून ते नोडल ऑफिसर म्हणून यशस्वी रीतीने कार्यरत आहेत, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना कायम करीत असताना त्यांना गट ‘ब’ अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.
तसेच ३ वर्षांपासून १००% समूदाय आरोग्य अधिकारी हे कोरोनाची कामे करीत आहेत. त्यामध्ये काही बरेचसे कर्मचारी कोरोना आजाराने ग्रस्त झालेत आमच्या संपर्कात येऊन आमचे संपूर्ण घरातील परिवार या आजाराने ग्रस्त झाले. मोठी आर्थिक हानी ला सामोरे जावे लागले. करिता राज्यातील सर्व समूदाय आरोग्य अधिकारी यांना कायम करण्यात यावे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे४० हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभव (लॉयल्टी) बोनस मिळणे बाबत. केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिवर्ष ५% वेतन वाढ
करणे आवश्यक असून अद्याप कोणत्याही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना वेतन वाढ करण्यात आलेली नाही. या सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रतिवर्ष पाच टक्के वेतन वाढ रुजू झाल्याच्या तारखेपासून लागू करण्यात यावी व आतापर्यंत न भेटलेली थकीत वेतन वाढ सुद्धा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात यावी ही विनंती.
त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांची पाच वर्षे सेवा झाली आहे. त्यांना १५% व त्यांची तीन वर्ष सेवा झाली आहे त्यांना १०% अनुभव रॉयल्टी बोनस प्रदान करण्यात आलेला नाही तो मंजूर करून तो देखील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात यावा ही देखील विनंती आपणास करण्यात येत आहे.
निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन ३६,००० रुपये ( ९०% ) व कामावर. आधारित वेतन ४,००० रुपये (१०%) करणेबाबत. आपले राज्य मधील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना निश्चित वेतन २५,००० रुपये देण्यात येते व कामावर आधारित वेतन १५,००० रुपये देण्यात येते. अन्य राज्यांमध्ये मासिक निश्चित वेतन वाढवून कामावर आधारित वेतन कमी करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर आपल्या राज्यामधील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना निश्चित वेतन ३६,००० रुपये व कामावर आधारित वेतन ४,००० रुपये करण्यात यावा ही विनंती. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात
धोरण निश्चित करणे बाबत महाराष्ट्र राज्यामध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यामुळे जिथे मिळेल तिथे समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर रुजू झाले. घरापासून लांब नोकरी करीतअसताना सोबतच बऱ्याच आर्थिक सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पण पार पाडाव्या लागतात. परंतु बदलीचे धोरण लागूनअसल्याकारणाने बरेच लोक नोकरी सोडण्याचे मानसिकतेत आहे. काही समुदाय आरोग्य अधिकारी यांनी नोकरी सुद्धा सोडलेली आहे. सदर भरती होत असताना स्वतःच्या जिल्ह्यात अथवा तालुक्यात आरोग्यवर्धिनी केंद्र उघडले नसल्याकारणाने दूरच्या जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी रुजू झालेले असून आजमितीस राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये सदर योजनेअंतर्गत
आरोग्यवर्धिनी केंद्र प्रारंभ झाले आहेत. अशा सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये बदली करण्यासंबंधी धोरण निश्चित करून त्या संदर्भात लवकर कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.२३ इंडिकेटरचे कामावर आधारित मोबदला रद्द करणेबाबत केंद्र शासनाने ठरविलेले व राज्य शासनाने ठरवलेले कामावर आधारित मोबदला यामध्ये तफावत आहे. तसेच प्रति इंडिकेटर १ हजार रुपये द्यावे असे केंद्र शासनाने सांगितले आहेत. करीता यावर राज्य शासनाने परत एकदा संशोधन करून समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविका यांना त्यानुसार इंडिरेटर वाटप करून योग्य न्याय द्यावा व तोपर्यंतआम्हाला जुनाच १५इंडिकरचा फाॅरमॅट सादर करणेसाठी परवानगी देण्यात यावी. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बढती देणे बाबत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेतील करियर प्रोग्रेशन प्लॅननुसार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना पाच वर्षानंतर बढती देण्यात यावी ही विनंती.

हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या यादीत
शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव
करणेबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना जो हार्ड एरिया अलाऊंस प्रदान करण्यात येतो ती यादी अपूर्ण असल्यामुळे दुर्गम व अति दुर्गम भागातील काही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सदर भत्ता मिळत
नाही. सदर यादी दि. २१ एप्रिल २०१५ व १९ मार्च २०१९ रोजी च्या शासन निर्णयानुसार परिपूर्ण करून त्या शासन निर्णयानुसार सर्व क्षेत्र उपरोक्त भत्याकरिता समाविष्ट करण्यात यावे ही विनंती.
टीएडीए मिळणे बाबत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरुप फिरस्तीचे
असल्यामुळे सदर प्रवासाकरिता होणारा खर्च लक्षात घेता सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रवासाकरिता टी. ए., डी.ए. देण्यात यावा ही विनंती करण्यात येत आहे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व विमा
संरक्षण मिळणे बाबत. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सकाळच्या वेळेत बाह्य रुग्ण विभाग सांभाळावा लागतो तसेच माध्यान्हानंतर फिरस्तीचे कर्तव्य पार पाडावे लागते. बाह्य रुग्ण विभाग व फिरस्ती
लक्षात घेता संसर्ग व अपघाताचा धोका समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य व अपघाती विमा संरक्षण प्रदान करण्यात यावे तसेच भविष्य निर्वाह निधी देखील लागू करण्यात यावा अशी
विनंती करण्यात येत आहे. वरील सर्व मागणी ही रास्त आहे त्यामुळे सर्व राज्यस्तरीय समूदाय आरोग्य अधिकारी हे दिनांक १६ जानेवारी २०२३ ला
मागण्या मान्य न झाल्यास एक दिवसीय कामबंद आंदोलन सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत कामे बंद करीत आहोत. जर तरीही आमच्या मागण्या वर काही मार्ग निघाले नाही तर आम्ही राज्यातील समस्त समूदाय आरोग्य अधिकारी हे दिनांक
२३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद
आंदोलन करत आहोत. कर मुंबईतील आझाद मैदानासह सर्व जिल्ह्यातील सर्व समुदाय
आरोग्य अधिकारी आपल्या जिल्ह्यातील जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार
आहोत. त्यामुळे आंदोलनाची सर्व जबाबदारी
शासनाची राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा दिला आहे