व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी होणार महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी – सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
दिल्ली, १० जानेवारी २०२३ : राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. आज मंगळवार, दि. १० जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यासहीत देशाचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी होईल. या सत्तासंघर्षाची सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज सुप्रीम कोर्ट नेमके कोणते निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आज पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आता पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे या प्रेमाच्या दिवशी काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे
या प्रकरणाची सध्याची सुनावणी ही पाच सदस्य घटना पिठापुढे सुरू आहे शिवनेरी शिवसेनेने ती साथ सदस्य घटनापिठापुर व्हावी अशी मागणी केलेली आहे तर एकनाथ शिंदे गटाने त्यास विरोध केल्याने नेमकी कोणाची मागणी मान्य होणार याकडे लक्ष लागलेले आहे
शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सात सदस्यीय घटनापीठाने फेरविचार करावा, अशी मागणी ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीच्या वेळी केली होती. या याचिकेवर आज सर्वोच न्यायालयात सुनावणी होणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचे आणि शिवसेनेतील फुटीचे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठाने दिला असून गुरुवारी घटनापीठाची पहिली सुनावणी होणार आहे. पण घटनापीठांपुढे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या ५०च्या घरात पोचली असून सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेल्या लाखो याचिकांमुळे पाच किंवा अधिक सदस्यांचे घटनापीठ स्थापन करुन त्यांच्यापुढील प्रकरणे निकाली काढण्यास काही वर्षांचा अवधी लागू लागला आहे. या पार्श्वभूमीवर घटनापीठ म्हणजे काय, त्यात किती न्यायमूर्तींचा समावेश असतो, आदी मुद्द्यांचा ऊहापोह.
तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार घेऊन गेले. शिवसेनेला एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे राज्यातलं महाविकास आगाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. पण नवीन सरकार स्थापन जरी झालं असलं, तरी नेमकी खरी शिवसेना कोणती? हा मोठा प्रश्न आता राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि खुद्द मतदारांसमोरही उभा राहिला आहे. कारण ४० आमदार आणि १२ खासदारांच्या पाठिंब्यावर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गट करतोय, तर बंडखोर आमदारांचा गट खरी शिवसेना कशी असू शकेल? असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जातोय.
खरी शिवसेना कोणाची व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या वादावर निर्णय घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केंद्रीय निवडणूक आयोगास दिली. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकही जाहीर झाली. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं. उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यामध्ये याबाबतचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाही हे आयोगाने स्पष्ट केले आहे.