एकमेकांना जमिनीवर आणणाऱ्या पवार फडणवीसांनी केला एका गाडीतून प्रवास
पुणे, ८ जानेवारी २०२३ : सकाळी शरद पवार यांनी “सत्ताधारी हवेमध्ये आहेत त्यांनी जमिनीवर यावे” अशी टीका शिंदे फडणवीस सरकारवर केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर देत “आम्ही जमिनीवरच आहोत हवेत कोण आहे याची आत्मपरीक्षण करावे” असा सल्ला दिला. त्यानंतर दोन्ही नेते मतभेद विसरून एकत्र आले. पवार म्हणाले “माझ्यासोबत गाडीत बसून चला”आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका क्षणात त्यांची विनंती मान्य करून गाडी घेऊन बसले. राज्यात एकीकडे टोकाचे राजकारण सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
सध्या राज्याचे राजकारण आरोप-प्रत्यारोपांमुळे ढवळून निघत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि भारती विद्यापीठ पुणे विद्यार्थी गृहनिर्माण संकुलाचे उद्घाटन आज (ता. 8) होणार आहे. हे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित आहेत.
या कार्यक्रमाच्या दरम्यान, मेडिल कॉलेजचे ग्रेस्ट हाऊस ते लेडीज हॉस्टेलपर्यंत पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी गाडीमध्ये मागील सीटवर पवार आणि फडणवीस होते, तर पुढच्या सीटवर शिवाजीराव कदम होते. मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधून जात असताना पवार, फडणवीसांना म्हणाले, चला माझ्या सोबत, त्यानंतर फडणवीस पवारांच्या गाडीत बसले.
दुसरीकडे लेडीज हॉस्टेलपासून कार्यक्रमाच्या स्थलापर्यंत पुन्हा एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी मात्र, पुढच्या सीटवर विश्वजीत कदम होते. राज्यातील राजकीय गदारोळात पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, सत्तेत असलेले लोक हवेत असल्यासारखे वागतात, टोकाची भूमिका घेतात, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही जमीनीवरच आहोत,’ आमची जमीन आम्हाला माहिती आहे, जमीनीवरच्या लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत, त्यामुळे खरच हवेत कोण आहेत? याचा शोध शरद पवारांनी घ्यावा, असे प्रत्युत्तर दिले, फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.