पुणे: चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई हल्ला केल्याच्या विरोधात शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

पुणे, ११ डिसेंबर २०२२: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदरणीय दादांवर शाईहल्ला केला. पाटील याबाबत दिलगिरी व्यक्त करुनही हा प्रकार घडला. या प्रवृत्तीविरोधात आणि विशेषत: हल्ल्याच्या सुत्रधारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत निषेध नोंदवला.

विश्वासघाताने आणि संधी साधूपणामुळे राज्यात आलेली सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. राज्यातील शांततेचे वातावरण बिघडवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा विरोधक सतत प्रयत्न करीत आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता संयमी आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या मर्यादेत राहून काम करणार आहे.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,आमदार भीमरावअण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक, मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.