रूपाली पाटील यांना प्रवक्तेपदाची पाटीलकी
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२: राज्यात मोठ मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांच्याकडे आक्रमक नेत्या म्हणून पाहिलं जातं. रूपाली पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली आहे.
रूपाली पाटील यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात अनेक आंदोलने केली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे.कोण आहेत रुपाली पाटील?रुपाली पाटील या व्यावसायानं वकील आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत गेली १४ वर्षे त्या मनसेसोबत होत्या.
सन २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानतंरही त्या विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्याऐवजी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना तिकिट देण्यात आले. पक्षासाठी निष्ठेनं काम करत असतानाही वारंवार आपल्याला डावललं जात असल्याचं सांगत अनेकदा मुलाखतींमधून त्यांनी पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.