राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्यात पर्यवेक्षकांची महत्त्वाची भूमिका; फडणवीसांच्या पुढे अडचणी
मुंबई, २७ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश आले भाजपने १३० जागा जिंकून एक नवा विक्रम स्थापित केला. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेले असताना भाजपने मात्र त्यावर अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. केंद्रीय नेत्यांनी अद्याप वाढदिवसाच्या नावाला हिरवा कंदील दर्शविला नाही. त्यातच आता भाजपचे दोन पर्यवेक्षक मुंबई येऊन भाजपच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्यांचा अभिप्राय केंद्रीय नेत्यांना कळून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यात आणखीन दोन ते तीन दिवस आणि शक्यता असून फडणवीसंच्या समोरील अडचणी कमी होताना नाव घेताना दिसत नाहीत असेच यावरून स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३२ जागांवर यश मिळाले आहे. भाजपला जवळपास एक हाती सत्ता राज्यातील जनतेने दिलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपला तशीही गरज उरलेली नाही. शिवसैनिकांनी मात्र पुन्हा एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे यासाठी दबाव तंत्र सुरू केलेले आहेत.
शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी तशी उघड भूमिका घेतलेली आहे त्यावरून महायुतीमध्ये वाद सुरू झालेला आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र यावेळेस मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असेल आणि त्याचे प्रमुख दावेदार हे फडणवीसच आहेत असे स्पष्ट सांगितले आहे त्यानंतरही केंद्रीय पातळीवरून अध्यापन निर्णय घेण्यात आलेला नाही.
निकाल लागल्यानंतर फडणवीस दिल्ली देवळात गेलेले असताना त्यांना नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. स्वतः आम्ही शहा येऊन मुंबईतील आढावा घेणार असताना आता मात्र दोन नेत्यांना पर्यवेक्षक म्हणून मुंबईत पाठवले जाणार आहे. हे नेते भाजपच्या १३० आमदारांशी वैयक्तिक चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री कोण असावे याचा आढावा घेतला जाणार आहे. भाजपमधून फडविशांसह राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगुंटीवार हे नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये सध्या फडणीस यांचे पाढे जड आहे. पण त्यावर पक्षाचे नेते शिक्कामोर्तब करणार आहेत.