महाराष्ट्र मध्ये पहिल्या दोन तासात 6.61% मतदान
पुणे, २० नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे भविष्य आज मतदान यंत्रामध्ये बंदिस्त होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्रामध्ये 6.61% इतक्या मतदानाची पहिल्या दोन तासांमध्ये नोंद झालेली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये 5.53% इतके पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाची नोंद झालेली आहे यामध्ये पुणे शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे दिसून आलेले आहे.
महाराष्ट्र सोबतच झारखंड येथे देखील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या ठिकाणी पहिला दोन तासात 12.71% इतके मतदानाची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त गतीने झारखंड येथे मतदान होत असल्याचे दिसून आले.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान
वडगाव शेरी 6.37%
शिवाजीनगर 5.29%
पुणे कॅन्टोन्मेंट 5.53%
पर्वती 6.30%
कोथरूड 6.50%
खडकवासला 5.44%
कसबा 7.44%
हडपसर 4.45%