विधानसभेला लढायच की पाडायचे हे जरांगे २० ऑक्टोबरला ठरवणार
जालना, १६ ऑक्टोबर २०२४: गेली वर्ष ते दीड वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे सरकारने काही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आता उमेदवार पाडायचे की उमेदवार उभे करायचे याबाबत लवकरच आपला निर्यण जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांनी बैठकीचं आयोजन केलं आहे.
ज्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्या सोबत मला चर्चा करायची आहे. उद्या महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटीत यावं. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत चर्चेसाठी यावं. २-२३ विषयांवर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बैठक सुरू होईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकिच्यादिवशी आपल्याला लढायचं की पडायचं हा निर्णय घ्यायचा आहे. परंतु, मराठ्यांनी आतापासूनच सावध राहायचं आहे. सगळ्यांनी कागद पत्रासह सगळ्यांनी तयार राहा. जर लढायच ठरलं तर तुमच्याकडे ३ दिवस अर्ज भरण्यासाठी राहणार आहेत. जर या निवडणुकीत लढायचं ठरलं तर तुमचे कागद पत्रांसह यावं असं सावधपणाचं आवाहनही जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षामध्ये अनेकदा आमरण उपोषण केलं. त्यानंतर गावोगावी साखळी उपोषणही झाले. मराठा समाजाचा मुंबईपर्यंत पायी मोर्चाही घेऊन गेले. तसंच, अनेक ठिकाणी मोठं शक्तिप्रदर्शन करत सभाही घेतल्या. परंतु, सरकारने काही त्यांच्या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत. आचारसहिंता लागेपर्यंत त्यांना सरकारकडून त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अरेक्षा होती. परंतु, काही निर्यण झाला नाही. त्यामुळे आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.