पुण्यातून काँग्रेसचे ४३ जण इच्छुक शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट मध्ये सर्वाधिक स्पर्धा

पुणे, १४ आॅक्टोबर २०२४ : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शहरातील आठ ही मतदार संघात मिळून ४३ जण कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारांसाठी आग्रही आहेत. त्यामध्ये सर्वाधिक शिवाजीनगर, तर त्या खालोखाल पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघात इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान रविवारी इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मतदार संघावर दावेदारी केली. तर महाविकास आघाडीत पर्वती आणि हडपसर मतदार संघासाठी पक्षाने आग्रह धरावा, अशी मागणी या दोन्ही मतदार संघातील इच्छुकांनी लावून धरली.

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे समन्वयक अजित दरेकर यांच्या उपस्थित आज पुण्यासह, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी शक्तीप्रदर्शन केले. शिवाजीनगर मतदार संघातून माजी आमदार दीप्ती चवधरी, हडपसर मधून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, तर पुणे कॅन्टोमेन्ट मतदार संघातून माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी तर कसबा विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

शिवाजीनगर मधून सनी निम्हण यांच्याही अर्ज या मतदार संघातून पक्षाकडून रिंगणात उतरण्यासाठी सर्वाधिक इच्छुक आहे. त्यामध्ये माजी आमदार स्वर्गीय विनायक निम्हण यांचे पूत्र सनी निम्हण यांनी देखील कॉंग्रेसकडून पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे. मुलाखतीच्या ठिकाणी ते उपस्थित राहिले नाहीत. निम्हण यांच्या बरोबरच २०१९ च्या निवडणूक थोडा फरकाने पराभव पत्करावे लागलेले दत्ता बहिरट, मनीष आनंद आणि त्यांची पत्नी पूजा आनंद यांच्यासह बारा जणांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. बाहेरून आलेल्या संधी देण्यापेक्षा स्थानिक आणि निष्ठावान यांना संधी द्यावी, अशी मागणी यावेळी इच्छुकांनी केली.

पुणे कॅन्टोमेन्ट आणि वडगाव शेरी मध्ये वेगळ्या विचाराची धमकी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोमेन्ट मतदार संघाने कॉंग्रेसला साथ दिली. त्यामुळे या मतदार संघात रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह त्यांचे पूत्र अविनाश बागवे, माजी नगरसेवक अविनाश साळवे यांच्यासह ११ अर्ज पक्षाकडे आले आहेत. मुलाखती दरम्यान या मतदार संघात बौद्ध समाजाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे यंदा या समाजाला संधी मिळावी, अशी मागणी काही इच्छुकांनी केली. आमच्यापैकी कोणालाही द्या, आम्ही काम करू अन्यथा आम्हाला वेगळा करू असा इशारा काही इच्छुकांनी दिला. तर गेली चाळीस वर्ष आम्ही या मतदार संघात काम करीत आहोत. पक्षाशी निष्ठावान आहोत, त्यामुळे आम्हाला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी बागवे यांनी यावेळी केली. तर वडगावशेरी मध्ये माजी नगरसेवक सुनील मलके यांच्यासह पाच जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेसला मानणारा हा मतदार संघ आहे. माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांच्या निधनानंतर पक्षाने या मतदार संघाकडे लक्ष दिले नाही. कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी खच्चीकरण करण्याकडे पक्षाच्या नेत्यांकडून भर दिला गेला. यंदा जर पक्षाने हा मतदार संघ घेतला नाही, तर आम्ही ‘सांगली पॅटर्न’ राबविणार, असा इशारा इच्छुकांनी निरीक्षकांना समोर दिला.

पर्वतीसाठी आग्रह,तर कोथरूडमधून एकच इच्छुक
माजी उपमहापौर आबा बागूल यांच्यासह तीन अर्ज दाखल झाले आहे. या मतदार संघाच्या मुलाखतीवेळी कार्यकर्त्यांनी ‘परत घ्या, परत घ्या, पर्वती मतदार संघ परत घ्या,’ अशा घोषणा देत कॉंग्रेस भवन दणाणून सोडले. या मतदार संघात भाजपला लढत कॉंग्रेसच देऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पक्षाकडून या मतदार संघासाठी आग्रह धरावा. ज्याला उमेदवारी मिळेल, त्यांचे काम आम्ही एकत्रितपणे करू, असे गाव्ही इच्छुकांनी यावेळी दिली. तर कोथरूड विधान सभा मतदार संघातून पक्षाकडे एकाच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

एकाला सगळ्या संधी कशा
कसब्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी महापौर कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर, मुक्तार शेख, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्याच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी आणि शिवानंद हुल्याळकर यांनी अर्ज दाखल केले आहे. महिलांसाठी ३३ टक्के कॉंग्रेसने आरक्षण आणले असे आपण सांगतो. परंतु आजपर्यप कॉंग्रेसने एकाही महिलेला संधी दिली. लाडकी बहिण योजनेचा विचार केला, तर महिलेला या मतदार संघातून संधी मिळावी, अशी मागणी व्यवहारे यांनी केली. तर मुस्लिम समाज कायम कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. एकालाच किती संधी देणार. मुस्लिम समाजाला संधी मिळाली पाहिजे, असे शेख यांनी सांगितले. तर ‘‘ पक्ष जो निर्णय घेईल, त्यास मी बांधिल आहे,’ असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.