…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते- बाळासाहेब थोरात
पुणे, २७ सप्टेंबर २०२२: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळणार असून त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
बाळासाहेब थोरात आज पुणे नवरात्र महत्वाच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,मंत्री म्हणजे जबाबदार व्यक्तिमत्त्व असत.सगळे मराठा समाजाला आंदोलना साठी प्रयत्न करत होते .त्या सगळयाचा अपमान केला आहे .अस वाटतंय.
पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो परत पुणे पोलिसांनी गुन्हा मागे घेतला आहे. त्यावर थोरात म्हणाले,बंदी घातली पाहिजे आशा संघटनेवर का भाजप बंदी घालत नाही.त्यांना पाठिशी घालत आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरपूर प्रतिसाद भेटत आहे त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,सर्व समाज राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत. १९४२ ला जसे झाले तसे राहुल गांधी भारत जोडो काम करत आहेत कोणी काही बोलाव हा त्याचा प्रश्न आहे. तसेच ,खरोखरच महाविकास आघाडी यांनी वेदात साठी प्रयत्न केले होते.तरुणांचे रोजगार घालवले. गुजरात खुश करण्याच काम या सरकारने केलंय अशी टीकाबाळासाहेब थोरात यांनी शिंदे व फडणवीस सरकार वर केली.
महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर असून काँग्रेस महापालिकेत किती जागा लढवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या वेळी म्हणून काम करू त्या त्या वेळी भूमिका ठरवू. तसेच शिंदे वफडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची नियुक्ती दोन तीन महिन्यांनी केली आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,पालकमंत्री केलं याचाच कौतुक,जनतेचे प्रश्न राहिले,आता काम करावे एवढीच अपेक्षा.