अजित पवारांना धक्का बसणार?, आमदार बबन शिंदे अन् रवी लांडे शरद पवारांच्या भेटीला

पुणे, ३० सप्टेंबर २०२४: राज्यात विधानसभेच्या जशा निवडणुका जवळ येत आहेत तशा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज सोलापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याचवेळी पिंपची चिंचवडचे विलास लांडे हेदेखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी बबन शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्या या भेटसत्रामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, बबन शिंदेंचा २ ऑक्टोबरला शरद पवार गटात प्रवेश होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार समर्थक असलेले माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे गेले आहेत. भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, शरद पवारांच्या भेटीला गेल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच राजन पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती.

अजित पवारांसोबत असणारे आमदार, माजी आमदार आणि लोकप्रतिनिधी शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचं लोकसभेतील स्ट्राईक रेट असण्याची शक्यता आहे. पक्ष सोडून गेलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात शरद पवार अनेक युवकांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय नेत्यांमध्ये भेटीगाठींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण लोकसभेत शरद पवार यांचे १०पैकी ८ खासदार निवडून आले आहेत. तर, अजित पवार यांचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे. त्यानंतर शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात गेलेल्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यात आता विधानसभा तोंडावर आल्याने अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचंही बोललं जातय.