जरांगे पाठोपाठ प्राध्यापक हाके देखील बसले उपोषणाला; मराठा आणि ओबीसींचा संघर्ष सुरू

जालना, २० सप्टेंबर २०२४ : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथे सुरुवात झालेली असताना त्यांना शह देण्यासाठी आता ओबीसी नेत्यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात आंदोलन सुरू केलेले आहे. ओबीसी आरक्षणाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे व इतर सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्लेली आहे.

राज्य सरकारने सगे सोयरांची अधिसूचना काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनुष्य जरांगे पाटील यांचे आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. राज्यात लाखोंच्या संख्येने अनेक सभा रोडशो देखील झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागा भाजपला गमवावे लागले आहेत. त्याच पद्धतीने आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील जरांगे पाटील आक्रमण झालेले आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा उपोषण स्थगित केले मात्र आता १६ सप्टेंबर पासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे. एकीकडे जरांगे पाटलांची उपोषण सुरू झालेले असताना दुसरीकडे ओबीसी नेते देखील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी देखील उपोषणाची हत्यार उपसले आहे आंतरवाली सराटी पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री या गावात लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेले आहे.

राज्य सरकारने जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर भाजपचे ११३ आमदार पाडणार असा इशारा जरांगे पाटील यांनी यापूर्वी दिलेला आहे. मात्र ओबीसी नेत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मतांची ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.

हाके यांनी राज्य सरकार टीका केली. हैदराबाद गॅझेट १९११ चे आहे. तो पुरावा शासनाचा चालत असेल तर राज्यात राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी स्थापन केला आहे? गॅजेट लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणी दिला असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केलेला आहे.