पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला एकटे पवारचं जबाबदार: राज ठाकरेंकडून पवार पुन्हा टार्गेट

नागपूर, २४ आॅगस्ट २०२४ : पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवार एकटे जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे. शरद पवार यांनी फोडफोडीचं राजकारण सुरु केले. गणेश नाईक, राणे गेले हे शरद पवार यांचं राजकारण असून, जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर सुरुवात झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला का? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी निश्चित असे उत्तर दिले. या सर्वाला जातीय वाद आणि फोडाफोडी कारणीभूत असल्याचे ठाकरे म्हणाले. मी माझ्या यापूर्वीच्या जाहीर सभांधूनही सांगत आलो आहे की, या सगळ्या गोष्टींना एकटे शरद पवार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पवारांनी या सर्व गोष्टींची सुरूवात केली असे सांगत जेव्हापासून पुलोद स्थापन झाले तेव्हापासून या गोष्टींना सुरूवात झाल्याचे ठाकरे म्हणाले. संत महापुरुष जाती जातीत कधीच विभागले नव्हते ते १९९९ पासून सुरू झाले. हा विषय सगळ्यांनी बंद केला पाहिजे.

गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभा निवडणुकीत काढणार

आचार साहिंता लागत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही असे म्हणत दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक लागतील अस वाटतं. मात्र, गेल्या पाच वर्षातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभा निवडणुकीत काढणार असेही ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराची प्रकरणं आहेत. सरासरी एका तासाला एक बलात्काराच्या प्रकरणाची नोंद असल्याचे सांगत बलात्काराची प्रकरणं मविआच्या काळातही समोर आली कठोर शासन होत नाही त्यामुळे रोज असे प्रकार सुरु असल्याचे ठाकरे म्हणाले.