मनसेचा तिसरा उमेदवार लातूर मधून जाहीर: राज ठाकरेंनी दौऱ्यात केली घोषणा

लातूर, ७ ऑगस्ट २०२४ ः दोन महिने बाकी असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसेभच्या मैदानात उतरली आहे. मनसेनेकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी मनसेने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. एकंदरीत, मनसेचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असं म्हणावं लागेल.

मनसेकडून यापूर्वी अधिकृतपणे दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही नेते राज ठाकरे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक आहेत. त्याचबरोबर वरळी विधानसभेमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याबाबत राज ठाकरे यांनी सकारात्मक संकेत दिले होते. आता चौथा उमेदवार देखील मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांचं नाव निश्चित झालं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेला देखील ते महायुतीसोबत लढण्याची शक्यता होती. पण, त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा केली. मनसे राज्यातील २२५ जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे. मनसे देखील चांगली टक्कर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकर हे देखील स्वतंत्र लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळी विधानसभेमध्ये रंगत येणार आहे.