उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात शंकराचार्यांची शिंदे-भाजपवर टीका

मुंबई, १५ जुलै २०२४: उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताने कार्यकाल मुख्यमंत्रीपदारून दूर केले गेले. हा जनादेशाचा अपमान आहे. या दु:खात मी देखील सहभागी असून, जो विश्वासघात करतो तो हिंदू असूच शकत नाही, अशी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज केली. त्यामुळे आता यास शिंदे व भाजप काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मातोश्री या निवासस्थानी आले होते. यावेळी ठाकरे दाम्पत्याने त्यांची पाद्यपुजा केली. तसेच शंकराचार्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या भेटीबाबत माहिती दिली.

यावेळी बोलताना शंकराचार्य म्हणाले की, आपण सर्वजण हिंदू सनातन धर्माचे पालन करणार आहोत. आपल्याकडे पाप पुण्य या संकल्पना आहेत. ज्यामध्ये विश्वासघात हे सगळ्यात मोठं पाप आहे. जो उद्धव ठाकरे यांच्या सोबत झाला आहे. तसेच त्यांना दुःख वाटत आहे. याच दरम्यान त्यांनी मला आमंत्रित केलं. मी देखील त्यांच्या सोबत झालेल्या विश्वासघाताच्या दुःखामध्ये सामील असल्याचं त्यांना सांगितलं.

त्यामुळे जोपर्यंत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसत नाही तोपर्यंत आम्हाला वाटणारं हे दुःख कमी होणार नाही. त्यावर ते म्हणाले की, तुमच्या जसा आशीर्वाद आहे. तसंच आम्ही प्रयत्न करू. तसेच हिंदुत्व बाबत बोलायचं झालं तर कुणाचा हिंदुत्व खरं आहे हे पाहावं लागेल? कारण जो विश्वासघात करेल तो हिंदू असू शकत नाही. मात्र जो विश्वासघात सहन करेल तो हिंदूच असेल उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेच्या देखील मनात आहे तेच निवडणुकीत दिसला आहे. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच जनादेशाचा आदर करून सरकार बरखास्त करणे योग्य नाही. असं म्हणत शंकराचार्यांनी ठाकरेंच्या समर्थनार्थ मोठं विधान केलं आहे.