सत्यजित तांबेंकडे ३६० सोने; १६ कोटीची मालमत्ता

नाशिक, १४ जानेवारी २०२३: काँग्रेसमध्ये असलेला अंतर्गत वाद नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. सत्यजित तांबेंनी काँग्रेसला फसवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

तांबे यांनी आपल्या उमेदवारी अर्जात आपल्याकडील संपत्तीचे माहिती दिली आहे. त्यानुसार तांबे व त्यांची पत्नी मैथिलीकडे १५.८५ कोटींची जंगम व स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे. सत्यजित यांच्याकडे ६० तोळे (३० लाख) व पत्नीकडे ३०० तोळे (मूल्य रु. १.५० कोटी) सोने आहे.

वार्षिक उत्पन्न ४९.१८ लाख रुपये आणि पत्नी मैथिलीचे ५२.२३ लाख रुपये असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केले आहे. त्यांच्याकडे २५ हजार रुपये आणि पत्नीकडे ४० हजार रुपये रोख आहेत.”सत्यजित तांबेंनी म्युचुअल फंड मधील व्यवहाराचा तपशील लपविला असल्याचा आरोप डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप हरिदास यांनी केला आहे.
सत्यजित तांबे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना रिझर्व्हेशन मिळत असेल तर पक्षातील निष्ठावंतांची घुसमट भयंकर वाढली असणार हे नक्की, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

‘सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचे समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले,”सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबाबत नाशिकमध्ये काहीतरी गुपित शिजतयं याची माहिती मिळाली होती, याबाबत मी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली होती पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,”