“दोन हजाराची नोट बंदी म्हणजे कसब्याच्या पराभवाचा बदला” – राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

पुणे, २० मे २०२३: केंद्र सरकारने दोन हजार रुपयांची बहुचर्चित नोट चलनातून काढून टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना या सर्व नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत देशात पुन्हा एक प्रकारची नोटबंदी लागू केल्याने त्या विभागात आज राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या कार्यासमोर आंदोलन करत केंद्र सरकारचे जोरदार घोषणाबाजी केली कसबा कर्नाटकच्या निकालाचा बदला काय नोटबंदी नोटबंदी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले प्रवक्ते प्रदीप देशमुख हे यावेळी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, ‘मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदीकरून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली व आज जवळजवळ सहा वर्षांनंतर ती नोटही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नोट देशाच्या अर्थव्यवस्थेकरीता किती पोषक आहे. हे भाजपचे समर्थक गेली अनेक वर्षे घसा फोडून सांगत आहेत मात्र आज त्या सर्वांना मोदींनी तोंडावर पाडले आहे.भक्तांच्या ह्या दुःखात सहभागी होण्याकरीता व नोटेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेले आहे.