चिंचवड बिनविरोध नाहीच; राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चिंचवडचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता ताणली गेली होती.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची निधन झाल्याने चिंचवड च्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झालेली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. तसेच जगताप कुटुंबातून अश्विनी जगताप यांना उमेदवारी द्यावी की शंकर जगताप यावरून वाद सुरू झाले होते. हा वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या घरी जाऊन मध्यस्थी करण्याची वेळ आली होती. अखेर

भाजपने या ठिकाणी जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून, या ठिकाणी राहुल कलाटे आणि नाना काटे हे दोघेजण इच्छुक होते. राहुल कलाटे यांनी 2019 च्या निवडणुकीत जोरदार टक्कर दिल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि चिंचवड ची जागा जिंकतील या दृष्टीने चर्चा सुरू होती. मात्र नाना काटे यांचे शरद पवार यांच्याशी असलेले कनिष्ठ संबंध या जोरावर त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांचे ट्विटद्वारे नाव जाहीर केले.पिंपरी चिंचवड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नाना काटे अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप