शिंदे फडणवीस सरकार १०० टक्के कायदेशीर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

नाशिक, ११ फेब्रुवारी २०२३ ः आम्ही राज्यात स्थापन केलेल सरकार हे संविधानसंमत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १०० टक्के आपल्या बाजूने लागणार आहे. त्यामुळे रोज हे सरकार बेकायदेशीर असल्यची टीका करणाऱ्यांची हा माझा संदेश आहे, तुमच्याकडे उरले सुरले १०-१५ आमदारही निघून जातील, अशी जळजळीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नाशिक येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीस म्हणाले, “आज राज्यात जे सरकार स्थापन झालं आहे. ते गद्दारांचं सरकार नाही तर खुद्दारांचं आहे. ही खुद्दारी जनतेसाठी, विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे, पण महाविकास आघाडीचे नेते रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितलं जातं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे.”

“मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काहीही काळजी करू नका. आपण जे केलंय ते नियमाने केलंय. कायद्याने केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल. कारण आपण संविधानासंमत राहून काम केलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला, तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आहे. पण न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, तर न्यायालय दबावाखाली आहे. निवडणूक आयोगाबद्दलही त्यांनी असंच म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उमटवण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे,”
पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. ते संविधानसंमत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे. पण पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकून येणार आहोत. कारण आम्ही जनतेची सेवा आम्ही करत आहोत.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप