संभाजीराजे अंतरावाली सराटीत हाके, संभाजीराजेंची एकमेकांवर टीका

जालना, २३ सप्टेंबर २०२४ गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसी संघर्ष पेटला. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवलीत उपोषण सुरू केलं. तर त्यांच्या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी वडीग्रोदीत उपोषण सुरू केलं. यावरून संभाजीराजे छत्रपतींनी हाकेंवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता हाकेंनी प्रत्युत्तर दिलं.

संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजा आणि शिवराय यांचेही वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही, अशी टीका हाकेंनी केली.

संभाजीराजे काय म्हणाले?
संभाजीराजेंनी हाकेंवर टीका करतांना मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना हा हक्क नाकारणे हे अयोग्य आहे. जरांगे अंतरवलीत आंदोलन करत आहेत, म्हणून पलीकडच्या गावात मुद्दाम कोणाला तरी आंदोलनाला बसवण्यात आलं का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

यावर बोलतांना हाके म्हणाले की, संभाजीराजे छत्रपतींना शोषितांबद्दल कळवळा नाही. मनोज जरांगेंचं आंदोलन राजकारणासाठीच करण्यात आलं होतं. मराठवाड्यातल्या बारा बलुतेदारांच्या दुकानांवर हल्ले झाले, नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरही हल्ले झाले. हे कशात बसतं? संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजा आणि शिवराय यांचेही वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही, अशी घणाघाती टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य निर्माण कऱण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची कुर्बांनी दिली. अन् तुम्ही विशाल गडारवती माझ्या मुस्लिम माता-माऊली लढत होत्या, तेव्हा तुम्ही हात वर करून चिथावणी देत होता. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही या अठरा पगड जातीच्या भटक्यांच्या आंदोलनाला भेट दिली असती. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. संभाजी भोसले, मी तुम्हाला राजा म्हणणार नाही, असं म्हणत त्या जरांगेंनी त्याच्या बॅनर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का?, असा सवालही हाकेंनी केला.

ते म्हणाले, अरे, जात चोरतात तुम्ही. त्यासाठी मागासवर्गीय म्हणून जन्माला यावं लागतं. जन्माने मागासवर्गीय असावा लागतो. नाहीतर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पॅरामीटर्समध्ये यावं लागतं. एकीकडे 96 कुळी मराठा म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला मागासवर्गीयांचं आरक्षण मागायचं. संभाजीराजे आम्ही तुम्हाला राजे म्हणायचं का? राजा हा राजा-राणीच्या पोटातून नाही, आंबेडकरांच्या संविधानातून जन्माला येतो. ओबीसी नेत्यांनो, या लोकांच्या दबावाखाली राहिल्यास महाराष्ट्रातून तुमचे अस्तित्व संपुष्टात येईल, असंही हाके म्हणाले.