पुणे: आपच्या महिला कार्यकर्त्यांतर्फे चंद्रकांत पाटील यांना शैक्षणिक साहित्य पाठवून निषेध

पुणे, १२/१२/२०२२: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्याबाबतीत केलेल्या चूकीच्या विधानाचा निषेध आम आदमी पार्टीतर्फे व्यक्त करण्यात आला. आपच्या महिला कार्यकर्त्यांनी डेक्कन पोस्ट ऑफीस येथून पाटील यांना शैक्षणीक साहित्य पाठविले. तसेच पाटील यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना इतिहास कळावा यासाठी पुस्तके घेण्यासाठी भिक मागून जमा केलेले पैसे देखील पोस्टाद्वारे मनीऑर्डर करुन पाठविण्यात आल्याचे आपच्या महिला बचतगट शहर संघटक सिमा गुट्टे यांनी सांगितले.
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच “महात्मा ज्योतिबा फुले, डॉं.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीरांनी भीक मागून शिक्षणसंस्था उभ्या केल्या” असे विधान केले होते. थोर महापुरुषांना अपमानीत करणार-या वक्तव्याच्या निषेधार्थ आपच्या वतीने जमा केलेली भीक पाटील यांना पाठवण्यात आली.

सिमा गुट्टे म्हणाल्या की, भिक मागून जमा केलेल्या पैशांमधून पाटील प्राथमिक शाळेची इतिहासाची पुस्तके वाचतील अशी आशा आहे. थोर-महान व्यक्तींचा इतिहास राज्यातील उच्च शिक्षणमंत्र्याला माहिती नसने ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. इतिहास माहिती असूनदेखील अशी वक्तव्य मुद्दाम केली जात असतील तर नेमकं कोणता अजेंडा भाजपला राबवायचा आहे? असा प्रश्न सिमा गुट्टे यांनी यावेळी केला. डॉ. आंबेडकरांनी, कर्मवीरांनी व महात्मा फुलेंनी शाळा सुरु करताना कधीही जात-धर्म बघितला नाही. त्यांनी केलेल्या महान कार्याला भाजपतर्फे वारंवार हिनवले जात आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करुन स्वार्थी राजकारण करुन सत्ताधारी पक्ष आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप गुट्टे यांनी केला.