चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणूकसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण

पुणे, 17 फेब्रुवारी 2023:- चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया आज वेळेत पूर्ण झाली.

निवडणूकीसाठी ७१४ कंट्रोल युनिट, १४२८ बॅलेट युनिट आणि ७६५ व्हीव्हीपॅट अशा एकूण २९०७ मतदान यंत्रांचे सिलिंग करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या या प्रक्रीयेनंतर सर्व मतदान यंत्रे थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून ही रूम सीलबंद करण्यात आली आहे. याठिकाणी सुरक्षेविषयक सर्व काळजी घेण्यात आली असून पुरेसा पोलीस बंदोबस्तदेखील येथे ठेवण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

ईव्हीएम सिलिंग कामकाजात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, माध्यम कक्ष समन्वयक किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्यासह भेल इलेक्ट्रॉनिक्सचे तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी यांचा सहभाग होता.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप